पाच साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ


Extension of five weekly special trains भुसावळ : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता पाच विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक 02132 जबलपूर-पुणे साप्ताहिक विशेष गाडीला आता 30 जूनपर्यंत तर 02131 पुणे-जबलपूर साप्ताहिक विशेष गाडीला 1 जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

या गाड्यांना मिळाली मुदतवाढ
ट्रेन क्रमांक 02187 रीवा-मुंबई साप्ताहिक विशेष गाडीला 27 जूनपर्यंत तर 02188 मुंबई-रीवा साप्ताहिक विशेष गाडीला 28 जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. 02198 जबलपूर-कोईम्बतूर साप्ताहिक विशेष गाडीला 28 जूनपर्यंत तर 02197 कोईम्बतूर-जबलपूर साप्ताहिक विशेष गाडीला 1 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष ट्रेनची वेळ, थांबा आणि रचना यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !