जळगावच्या मनीषा मोराणकरांनी एमपीएससी परीक्षेत मारली बाजी
Manisha Morankar of Jalgaon topped the MPSC exam जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल (2022) बुधवारी सायंकाळी जाहीर झाला आहे. त्यात जळगाव शहरातीलर हिवासी मनीषा रवींद्र मोराणकर यांनी यश मिळवले. मनीषा यांना निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था हे ग्रुप बीचे पद मिळाले आहे.
मनीषा यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मनीषा या जळगाव तरुण भारतचे ज्येष्ठ पत्रकार रवींद्र माधव मोराणकर यांच्या कन्या होय.







