कोरपावलीच्या अल्ताफ तडवीचा दिल्लीत वाजला ‘डंका’


Korpavali’s Altaf Tadvi hit ‘Danka’ in Delhi यावल : यावल तालुक्यातील कोरपावली येथील अल्ताफ तडवी या तरुणाने नुकत्याच पार पडलेल्या सांस्कृतिक मंत्रालय दिल्लीद्वारा संचालित साहित्य अकादमीत भिल्लोरी भाषेचे दिल्लीत प्रतिनिधित्व केले. या साहित्य महोत्सवात 1100 भाषांचे कवी, लेखक, साहित्यिक उपस्थित होते.

1100 भाषांचे कवी, लेखकांची उपस्थिती
सांस्कृतिक मंत्रालय, दिल्लीद्वारा संचलित साहित्य अकादमी दिल्ली यांनी आपल्या 70 वर्षाच्या उपलक्षामध्ये 11 ते 16 मार्च 2024 वर्ल्ड लिटरेचर फेस्टिवल आयोजित केले होते. रवींद्र भवन, दिल्ली येथे आयोजित या कार्यक्रमाच्या उद्घाटनाकरीता सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते. साहित्य महोत्सवात 1100 भाषांचे कवी, लेखक, साहित्यिक उपस्थित होते,. 13 रोजी प्रसिद्ध गीतकार, शायर, डाईरेक्टर, पदमभूषण पुस्कार प्राप्त, ज्ञानपीठ पुस्कार प्राप्त गुलझार यांची प्रमुख उपस्थिती होती. आठ तास सलग वाचनाचे जीनियस बुक रेकॉर्ड बनवण्यात आले. या कार्यक्रमात कोरपावली, ता.यावल येथील सुप्रसिद्ध कवी, शायर अलताफ सलीम तडवी यांना आदिवासी तडवी भिल (भिल्लोरी) भाषेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निमंत्रण देण्यात आले. त्यांनी आपल्या भाषेचे उत्कृष्टरित्या प्रतिनिधित्व केले. दररोज कार्यक्रमामध्ये 72 सेशन होत होते व विविध भाषेचे साहित्यकार आपले कविता, गोष्टी व प्रश्न मांडत होते. भारतातील सर्वच राज्यातील साहित्यिक उपस्थित होते. 16 मार्च रोजी नवी दिल्ली येथे वर्ड लार्जेस्ट लिटरेचर फेस्टिवलचा समारोप झाला.




कोरपावलीत तडवी यांचा गौरव
कवी, शायर अलताफ सलीम तडवी यांनी तीनवेळा आदिवासी तडवी भील बोली राष्ट्रीय व अंतराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांच्यामुळे संपूर्ण समाजाला त्यांचा अभिमान असल्याने कोरपावली येथे त्यांचा व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. आपल्या गावातील व्यक्ती आपल्या साहित्याच्य्या जोरावर दिल्लीपर्यंत मजल मारू शकतो याचे अभिमान असल्याचे लोकनियुक्त सरपंच विलास अडकमोल यांनी सांगितले. कोरपावली येथील तरुण अल्ताफ तडवी यांनी उत्तम कामगिरी बजावल्याने कोरपावली ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !