भुसावळातील देविदास भोळे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण
Annual Prize Distribution at Devidas Bhole College, Bhusawal भुसावळ : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात मंगळवार, 19 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वाजता वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, व माजी सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.राजू फालक यांच्याहस्ते शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा गुणवंत प्राप्त विद्यार्थांना प्रमाणपत्र, रोख पारितोषिक, खेळाडूंना मोमेंटो, ट्रॅकसूट देऊन सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर पारितोषीक वितरण समारंभ प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
प्राचार्य डॉ.राजू फालक म्हणाले की, आपणही इतर विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी झालो म्हणजे आपला ही आनंद द्विगुणित होतो. सूत्रसंचालन प्रा.डॉ.डी.एस.राणे तर आभार प्रा.डॉ.जयश्री सरोदे यांनी मानले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील डॉ.जे.बी.चव्हाण, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.संजय चौधरी, प्रा.डॉ.राजेश ढाके, डॉ.अनिल सावळे, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.संगीता धर्माधिकारी प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.धनश्री नेहते, प्रा.कामिनी चौधरी, प्रा.जागृती सरोदे, प्रा.आरती नवघरे, प्रा.आरती भोई, प्रा.सुशीला बाटे, प्रा.गायत्री नेमाडे, राजेश पाटील, प्रमोद नारखेडे, मिलिंद नेमाडे, सुधाकर चौधरी, प्रकाश चौधरी, सुनील ठोसर, दीपक महाजन, विजय पाटील, प्रकाश सावळे महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्याार्थी खेळाडू यांनी परिश्रम घेतले.







