यावल शहरात शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा
यावल : शहरातील विस्तारीत भागात आसाराम नगरात असलेल्या श्री हरिहरेश्वर महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात झाला. बुधवारी सकाळपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले. मंदिरात विधीवत शिवलिंग स्थापन करण्यात आले. मंदिर व मूर्ती प्राणप्रतिष्ठेनंतर भाविक, भक्तांमध्ये महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
विविध धार्मिक कार्यक्रम
यावल शहरातील विस्तारित भागातील आसाराम नगरात श्री हरिहरेश्वर महादेव मंदिराची उभारणी करीत येथे शिवलिंग प्राणप्रतिष्ठान सोहळा मोठ्या उत्साहात झाला. बुधवारी सकाळी भगवान भास्कर राजपूत, एम.एम.पाटील, डी.आर.देशमुख, डॉ.येवले, बापू कोलते, योगेश राजपूत, वैष्णवी पाटील, मृणाली पाटील या मान्यवरांच्या हस्ते होम हवन, पुजन व शिवलिंग प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. धार्मिक विधी मनीष बैरागी महाराज यांनी पार पाडला. डॉ.विवेक अडकमोल, पंकज प्रकाश बारी, बापू लोहार, भगवान राजपूत, राजेश्वर बारी, अनुराग फालक, विक्रम राजपूत आदींनी परिश्रम घेतले.







