उटखेडा येथे जुगार अड्डयावर धाड : सव्वा तीन लाखांच्या मुद्देमालासह नऊ जुगारी जाळ्यात

रावेर : रावेर तालुक्यातील उटखेडा येथे झन्ना-मन्ना जुगाराच्या अड्डयावर पोलिसांनी धाड टाकून सुमारे साडे पंधरा हजारांच्या रोकडसह सात मोबाईल व सात मोटारसायकल मिळून सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत नऊ जणां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
रावेर पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना जुगाराबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. उटखेडा शिवारातील नकट्या नाल्याच्या शेजारी पडीक जमिनीवर उघड्यावर झन्ना-मन्ना जुगार सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोलीस कॉस्टेबल प्रमोद पाटील, समाधान ठाकुर, राहुल परदेशी, महेश मोगरे, अमोल जाधव यांच्या पथकाने धाड टाकत 15 हजार 500 रुपये रोख, एक कॅटचा बॉक्स व पत्त्याचा कॅट, पाच ऍन्ड्राईड व दोन साध्या बटणाचे असे 48 हजार रुपये किंमतीचे सात मोबाईल, दोन लाख 40 हजार रुपयांच्या सात मोटारसायकली मिळून एकुण तीन लाख तीन हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला.
नऊ जुगारींना अटक
पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राहुल भालेराव (रा.कुसुंबा खुर्द, ता.रावेर), कादर रुबाब तडवी, (लोहारा, ता.रावेर), मोसीन हुसेन तडवी (जी.आय.एस.कॉलनी, ता.रावेर), कलीम रज्जाक खाटीक (लोहारा, ता.रावेर), फिरोज रमजान तडवी (लोहारा, ता.रावेर), विकास रमेश पवार (लोहारा, ता.रावेर), सुलेमान आमद तडवी (लोहारा, ता.रावेर), मुकेश धना भालेराव (कुसुंबा खुर्द, ता.रावेर), काशीनाथ तापीराम धनगर (सावखेडा, ता.रावेर) या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे


