शिवदत्त नगरात पाणीटंचाई : भुसावळ पालिका मुख्याधिकार्‍यांना निवेदन


Water shortage in Shivdutt Nagar: A statement to Bhusawal Municipal Commissioner भुसावळ : भुसावळ शहरातील शिवदत्त नगर भागात पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त आहेत. पाणीटंचाईची समस्या सोडवण्याबाबत मंगळवार, 26 रोजी शिवदत्त नगरातील नागरिकांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन दिले.

नागरीकांचे पाण्यासाठी हाल
उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. त्यातच नगरातील बहुतांश बोअरवेल कोरडे पडत आहेत. नागरिक स्वतःचा पैसा, वेळ खर्च करून नव्याने बोअरवेलचे काम करत आहेत पण 250 ते 350 फुटावर सुद्धा पाणी लागत नसल्याचे चित्र सध्या शिवदत्त नगर भागात दिसून येत आहे. एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा कडाका आणखी वाढणार आहे. या भागात प्रशासनाकडून पाईपलाईन टाकली गेली मात्र त्याला पाच वर्षे उलटून गेले पण पाण्याचा एक थेंब सुद्धा आला नाही. परिसरातील भागांना पाणीपुरवठा करणारी टाकी आहे. पाईपलाईनच्या माध्यमातून शिवदत्त नगर भागासाठी या पाणी टाकीतून पाणीपुरवठा करावा. प्रशासनाने लवकरात लवकर शिवदत्त नगरवासीयांचा पाणी प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिकांनी मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्याकडे केली.


यावेळी बी.वाय.सोनवणे, माजी नगरसेवक राजू आवटे, वेदप्रकाश ओझा, मनीष पवार, विजय यादव, आयुष श्रीवास, शैलेश वर्मा, इत्यादी नागरिक उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !