ज्यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा तो करा : मनोज जरांगे पाटील


जालना  : मी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे करणार नाही, कुणालाही पाठिंबा देणार नाही. आपण विधानसभेची तयारी सुरू करू मराठा आणि कुणबी एकच आहे. सगेसोयर्‍यांची अंमलबजावणी करण्यासह मराठा आरक्षणाच्या इतर मागण्यांबाबत जे उमेदवार काम करतील, त्यांना मतदान करा. तुम्हाला कोणाला पाडायचे ते पाडा, ज्यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा तो करा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले.

आरक्षणाचे वाटोळे न होण्यासाठी अपेक्ष उमेदवार नाही
मनोज जरांगे-पाटील यांनी गावागावांतून आलेल्या अहवालांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी अंतरवाली सराटी येथे बैठक घेतली. दिवसभरात आलेल्या अहवालांचा अभ्यास करून लोकसभेसाठी उमेदवार न देण्याचा अंतिम सार काढला. आरक्षण आणि लेकरांचे वाटोळे होऊ नये यासाठी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार द्यायचा नाही. आपण विधानसभेची तयारी आतापासूनच सुरू करू, असे जरांगे म्हणाले.


करेक्ट कार्यक्रम करण्याचे सूचक विधान
आरक्षणासाठी महिलांवर लाठीहल्ला झाला. हजारो युवकांवर गुन्हे दाखल झाले. शेकडो युवकांचे बळी गेले. त्यामुळे ज्यांनी आमच्यावर अन्याय केला त्यांना धडा शिकविण्यासाठी निवडणूक लढवायची, असे मत समाजाचे होते. त्यासाठी गावागावांत जाऊन समाजाच्या मतांचा अहवाल आणा, असे सांगितले होते. हा अहवाल अपुरा आहे. राजकारणापुढे आरक्षणाचा प्रश्न मागे पडत आहे. त्यामुळे आरक्षण आणि लेकरांचे वाटोळे होऊ नये यासाठी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार द्यायचा नाही. आपण विधानसभेची तयारी आतापासूनच सुरु करू. मराठाच नव्हेतर, सर्व जाती-धर्माचे लोक देणारे बनवू, आता तुम्हाला कोणाला मतदान करायचे ते करा. पण, ज्यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा तो करा, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !