भुसावळात लेवा समाजाचा मेळावा : 55 उपवर-वधूंनी दिला परिचय
Gathering of Lewa community in Bhusawal: 55 grooms and brides give introductions भुसावळ : भोरगांव लेवा पंचायत ठाया पाडळसे, शाखा भुसावळतर्फे विधवा विधूर घटस्फोटीत, शेतकरी, प्रौढांसाठी शहरातील संतोषी माता हॉलमध्ये बारावा वधू-वर परिचय मेळावा झाला. मेळाव्याव्यासाठी पुणे, वापी, सुरत, छत्रपती संभाजी नगर, मलकापूर, व विदर्भातील पालक व उपवर-वधूंसह उपस्थित होते. मेळाव्यात 40 उपवर तर 15 उपवधूंनी आपला परिचय दिला.
कोरोना काळातील जन्मलेल्या मुलींच्या लग्नाचा खर्च उचलणार
प्रास्ताविक भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेचे अध्यक्ष अॅड.प्रकाश पाटील यांनी केले. समाजहितासाठी आम्ही मेळावा घेत असतो त्याचा नक्कीच फायदा होतो, असे सांगून ते म्हणाले की, कोरोना काळात जन्म झालेल्या लेवा समाजातील मुलींच्या लग्नासह शिक्षणाचा खर्च भोरगांव लेवा पंचायततर्फे करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. छत्रपती संभाजी नगरहून आलेले उद्योगपती वसंत पाटील यांचा लेवा उद्योगरत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. या पुरस्काराचे वाचन मंगला पाटील यांनी केले. उपक्रम चेअरमन आरती चौधरी यांनी कार्यक्रमासंबधी उपस्थितांना माहिती दिली. यावर्षी 16 मुलींचे समुपदेशन करून त्यांचे संसार सुरळीत केले तर आतापर्यंत 76 मुली नांदायला गेल्या, असे त्या म्हणाल्या. घटस्फोटाचे प्रमाण पाहता एकचतुर्थांश मुली नांदायला गेल्या. ही समुपदेशन कक्षाची जमेची बाजू आहे.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
कथाकथनकार व.पू.होले कथाकार यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ललित पाटील, वसंत पाटील, मधुकर सरोदे, अॅड.प्रकाश पाटील, परीक्षीत बर्हाटे, आर.जी.चौधरी, शरद फेगडे, डिगंबर महाजन, उपक्रम चेअरमन आरती चौधरी, मंगला पाटील, स्वाती भोळे आदींची उपस्थिती होती.
जळगाव भोरगांव पंचायतीचे सदस्य अशोक चौधरी, यादवराव बर्हाटे, उल्हास पाटील, शाम भारंबे, मनोज जावळे, रूपेश चौधरी, अर्चना पाटील, शालिनी पाटील, चारूलता पाटील आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचलन डॉ.बाळू पाटील तर आभार स्वाती भोळे यांनी मानले. दरम्यान, मेळाव्यात वधू-वर सुचीचे प्रकाशन करण्यात आले. या सूचीत विधवा, विधूर, प्रौढ, शेतकरी मुला-मुलींची नावे आहेत.




