शिवभूषण पुरस्काराने भुसावळातील उमाकांत शर्मा यांचा सन्मान
Umakant Sharma from Bhusawal honored with Shivbhushan Award भुसावळ : भुसावळ शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा कट्टर शिवसैनिक उमाकांत उर्फ नमा शर्मा यांचा शिवजयंती उत्सव समितीतर्फे त्यांनी आजवर केलेल्या सामाजिक, पर्यावरण, राजकीय क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत ‘शिवभूषण पुरस्कार 2024’ देऊन सन्मानीत करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून शर्मा हे सतत दरवर्षी शिवजयंतीसह परशूराम जयंती साजरी करतात तसेच गेल्या सात वर्षांपासून शिववंदना घेणे यासह महिला दिनी महिलांचा सन्मान करणे, वृक्षारोपण करणे, गरीब व गरजू महिलांना साडी वाटप, गरिबांना अन्नदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आदी उपक्रम राबवतात. या सर्व कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, मुकेश गुंजाळ, उपाध्यक्ष मिलिंद कापडे, राजेश भोई, राहुल तायडे, पवन पाटील, हर्षल पाटील, दलजीत चौधरी, पंकज हिंगणे यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजीक झालेल्या कार्यक्रमात नमा शर्मा यांना ‘शिवभूषण पुरस्कार 2024’ ने सन्मानीत करण्यात आले. शाल, श्रीफळ स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार मिळाल्यानंतर शर्मा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





