जळगावसह मध्यप्रदेशात दुचाकींची चोरी : अट्टल चोरटे रावेर पोलिसांच्या जाळ्यात

एक लाख 40 हजारांच्या चोरीच्या चार दुचाकी पोलिसांकडून जप्त


Theft of two-wheelers in Jalgaon and Madhya Pradesh : Attal thieves in Raver police’s net रावेर : रावेर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन दुचाकी चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून विविध भागातून चोरी केलेल्या चोरीच्या एक लाख 40 हजार रुपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत.

दुचाकी चोरीच्या तपासात चोरटे जाळ्यात
नांदुरपिंप्री, ता मुक्ताईनगर येथील लिलाधर पाटील यांची मोटरसायकल रावेर बसस्थानकातून अज्ञात चोरट्यांनी लांबवल्यानंतर रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांनी सीसीटीव्ही फुटेज आधारावर तपास करण्याचे निर्देश तपास पथकाला दिले. पोलिसांनी त्यानंतर जळगाव येथून आरोपी चंद्रकांत रामदास साळुंखे तर वढोदा, ता.यावल येथून भरत गणेश सोनवणे यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी रावेर, वरणगांव, जळगाव, बर्‍हाणपूर (मध्यप्रदेश) येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.


विविध ठिकाणावरुन चोरलेल्या दुचाकी जप्त
दोघां आरोपीकडून चाळीस हजार हजार किंमतीची हिरो होंडा कंपनीची क्रमांक (एम.एच.19 बी.के.9448), 35 हजार किमतीची हिरो होंडा एच एफ डिलक्स विना नंबर प्लेट, 30 हजार किंमतीची प्लॅटीना (क्रमांक एम.एच.19 डी.ओ.8738) तसेच 35 हजार किंमतीची टीव्हीएस स्टार सिटी (एम.पी.12 एम.सी.2570) अशा चार दुचाकी जप्त केल्या आहेत.

यांच्या पथकाने केली कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक ईश्वर चव्हाण, सुरेश मेढे, समाधान ठाकुर, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, अमोल जाधव, महेश मोगरे, विकार शेख, सुकेश तडवी यांच्या पथकाने कारवाई केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !