भुसावळातील यावल रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरूवात : वाहन धारकांना मोठा दिलासा


Asphalting of Yaval Road in Bhusawal begins : Big relief for vehicle owners भुसावळ  : गेल्या अनेक दिवसांपासून यावल रस्त्याचे काँक्रिटीकरण व डांबरीकरण मंजूर झाल्यानंतरही प्रत्यक्षात कामाला सुरूवात होत नसल्याने वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त होत होती तर वाहनधारक खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना वैतागले होते. वाहनधारकांची होणारी गैरसोय लक्षात घेता मंगळवार, 2 एप्रिलपासून ठेकेदाराला यावल रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरूवात केली आहे. यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा ते तापी नगर रिक्षा स्टॉपपर्यंत काँक्रिटीकरण तर तेथून पुढे यावल वाय पॉईंटपर्यंत दर्जेदार पद्धत्तीने डांबरीकरण होणार असल्याची माहिती कंत्राटदार विनय बढे यांनी दिली.

वाहनधारकांना मोठा दिलासा
अर्थसंकल्पीय निधी व वैशिष्ट्यपूर्ण कामे योजनेतून यावल रोडच्या डांबरीकरण कामाला मंजुरी मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभानाने नऊ महिन्यांची मुदत दिली होती. ठेकेदाराला कार्यारंभ आदेशही दिले मात्र या कामासाठी निधीची तरतूद नसल्याने कात रखडले होते मात्र मंगळवारपासून डांबरीकरणाला सुरूवात झाल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राष्ट्रपिता गांधी पुतळा ते तापीनगर रिक्षा स्टॉप हा 625 मीटर लांबीच्या मार्गाचे काँक्रिटीकरण होणार असून त्याची निविदा प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे तर पुढील मार्गाचे डांबरीकरण होत आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !