जिथे कायदा-सुव्यवस्था, शांती आहे तिथेच खरा विकास

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी : फैजपूरात शांतता समितीची बैठक


Where there is law and order, peace, there is real development फैजपूर : जिथे कायदा-सुव्यवस्था शांती आहे तिथेच खरा विकास साधला जाऊन विविध सणांचा खरा आनंद प्राप्त होतो, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केले. फैजपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या 29 गावांमध्ये रमजान ईद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती, श्रीराम नवमी सण-उत्सव शांतता साजरे होण्याच्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक घेण्यात आली.

शांतता राखण्याचे श्रेय नागरीकांना
शांतता कमिटी समितीच्या बैठकी प्रसंगी पोलीस अधीक्षक म्हणाले की, फैजपूर शहरात गेल्या 25 ते 30 वर्षांपासून हिंदू-मुस्लिम सर्व जाती-धर्माचे सण व उत्सव मोठ्या आनंदाने व शांततेत साजरे करतात. कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही. याचे सर्व श्रेय नागरीकांना जाते. शहरातील विविध धर्माचे प्रमुख, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, विविध जाती-धर्माचे ज्येष्ठ कार्यकर्ते, यांच्या सहकार्याने शांततेसाठी प्रयत्न केले जातात. ही आनंदाची बाब आहे. यापुढे येणारे सण व उत्सव रमजान ईद, श्रीराम जयंती, हनुमान जयंती, डॉ.आंबेडकर जयंती, तसेच येणार्‍या लोकसभेच्या निवडणुका सर्वांनी शांततेत पार पाडाव्या तसेच शहरवासीयांनी आपल्या मतदानाचा हक्क नी संकोचपणे बजवावा, असे आवाहन त्यांनी केले.


यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर सहा.पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, फैजपूर पोलीस स्टेशनचे सहा.निरीक्षक निलेश वाघ उपस्थित होते. शांतता समितीच्या बैठकीनंतर इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंग, खरेदी-विक्री संघाचे सभापती नरेंद्र नारखेडे, माजी नगरसेवक केतन किरंगे, जावेद जनाब यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन एपीआय निलेश वाघ तर आभार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मयुद्दीन सय्यद यांनी केले.

यांची बैठकीला उपस्थिती
शांतता समितीच्या बैठकीला माजी नगराध्यक्ष पी.के.चौधरी, माजी उपरागराध्यक्ष शेख कुरबान कलीम मण्यार, माजी होमगार्ड जिल्हा समादेशक पंडित कोल्हे, माजी नगरसेवक जफर मेंबर, संजय रल, रशीद तडवी, रईस मेंबर इरफान मेंबर, रियाज मेंबर कौसर अली अनंता नेहते, रशीद तडवी, रामा होते यांच्यासह पीएसआय विनोद गाभणे, पीएसआय बबनराव पाटोळे, पीएसआय मैनुद्दीन सय्यद, गोपनीयचे योगेश दुसाने, राजेश बर्‍हाटे, होमगार्ड दलाचे श्रीकांत इंगळे, शांतता समितीचे सदस्य लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !