मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो : दहिगावात मतदान जनजागृती


Be the seat of the voter king, be the thread of democracy : Voting awareness in Dahigaon यावल : यावल तालुक्यातील दहिगाव या गावात मतदान राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीपर रॅली काढली. मुख्य चौकात मतदारांना शिक्षकांनी मार्गदर्शन केले. दहिगाव, ता.यावल या गावात प्रांताधिकारी देवयानी यादव, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, गटशिक्षणाधिकारी तथा मतदान जनजागृती कार्यक्रम नोडल अधिकारी विश्वनाथ धनके, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, निवडणूक नायब तहसीलदार रशीद तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श विद्यालय, जि.प.मराठी प्राथमिक व उर्दू प्राथमिक शाळेतर्फे मतदान जनजागृती करण्यात आली.

शिक्षकांकडून मतदारांना मार्गदर्शन
या निमित्ताने गावातून रॅली काढण्यात आली. मुख्य चौकात मतदार नागरीकांना शिक्षकांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.बी.पाटील, पर्यवेक्षक आर.पी.साळुंखे, उत्सव समितीचे अजय पाटील, एम.आर. महाजन, डी.जे.ठाकरे, आर.आर.चौधरी, सविता महाजन, व्ही.बी.पाटील, डी.आर.महाजन, एस.एस.सोनवणे, के.ए.अहिरे, सलीम तडवी, निशा पाटील, मीना तडवी, मनीषा गजरे, प्रतिभा पाटील, एस.आर.चौधरी, धनंजय तळले सहआदर्श विद्यालयातील शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा सहभाग होता. सर्वांच्या सहभागात मतदान जनजागृती रॅलीत काढण्यात आली.


मुख्याध्यापक पी.बी.पाटील यांनी मतदान जनजागृती रॅलीचे प्रस्तावना सादर केली. अजय पाटील यांनी मतदान राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो या घोष वाक्यासह मतदान जनजागृतीसाठी मनोगत व्यक्त केले. गावात प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी हातात फलक घेवून मतदान जनजागृतीपर घोषणा दिल्या व मतदानाचे महत्व व लोकशाही विषयी जाणीव व महत्व पटवून करून दिले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !