भुसावळ हे तर मिनी हिंदुस्तान : पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी
पोलीस दल व शिखर एनजीओच्या सहकार्याने भुसावळात इफ्तार पार्टी
Bhusawal is a mini India: Superintendent of Police Dr. Maheshwar Reddy भुसावळ : भुसावळ जंक्शन शहर हे खर्या अर्थाने ‘मिनी हिंदूस्तान’ आहे. याची एक नाही अनेक उदाहरणे आहेत. सर्व जातीचे लोक येथे गुण्या गोविंदाने राहतात. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही जातीय तेढ निर्माण झाली नाही अशी घटना शहरात झाली नाही ही अभिमानाची बाब आहे. नेहमीच भुसावळकरांचे पोलीस प्रशासनाला सहकार्य असते, एस प्रतिपादन रिंग रोड येथील शिखर इन्स्टिट्यूट येथे जळगाव जिल्हा पोलीस, भुसावळ उपविभाग व शिखर ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने आयोजित इफ्तार पार्टीत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी केले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, तहसीलदार नीता लबडे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन, शहरचे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन जगताप, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ.संदीप पानझाडेसह हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते.

सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन
शहरामध्ये जातीय सलोखा निर्माण व्हावा, भाईचारा रहावा शांतता नांदावी पोलीस कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे तसेच लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आचारसंहितेचा कुठलाही भंग होणार नाही याचे दक्षता घेत सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. असे आवाहनही यावेळेस पोलीस अधीक्षक महेशवर रेड्डी यांनी केले.
ईद गुण्या-गोविंदाने आनंदाने साजरी करा
येत्या आठ दिवसांमध्ये रमजान ईद साजरी होणार असून मोठ्या आनंदाने ती साजरी करावी, असे आवाहनही पोलीस अधीक्षकांनी केले.
यांचे यशस्वीतसोठी परीश्रम
शिखर एनजीओचे अध्यक्ष रफिक शेख व उपाध्यक्ष वासेफ पटेल, जिल्हाध्यक्ष जाकिर शेख, खलील मन्यार, संजय पाटील, सय्यद मोहम्मद, शकील अली, फहीम शेख, जुनेद खान, शबीर अहमद, मुजाहिद तडवी, साजीद कुरेशी आदींनी परिश्रम घेतले.




