भुसावळातील अट्टल सोनसाखळी चोरट्यांना मध्यप्रदेशात बेड्या : विशेष पथकातील कर्मचार्यांचा पोलीस अधीक्षकांकडून गौरव
नवापूरसह उपनगर व नंदुरबार पोलिसांनाही आरोपी होते वॉण्टेड

Attal gold chain thieves in Bhusawal chained in Madhya Pradesh : Superintendent of Police felicitates special team personnel जळगाव : सेंधवा तालुक्यातील जुलवानिया येथील इराणी वस्तीतून भुसावळ शहरातील अट्टल सोनसाखळी (चैन) चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दोन दिवस वेषांतर करीत पोलीस या भागात वावरले व आरोपी हातात लागताच त्यांच्या मुसक्या बांधण्यात आल्या. विशेष पोलीस पथकातील या कर्मचार्यांचा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी जळगावात सन्मान केला.
सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस येणार
जळगावातील गायत्री नगरात पायी जात असलेल्या सुलोचना वसंत खैरनार (60) या वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरुन आलेल्यांनी लांबवल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील संशयीत मध्यप्रदेशातील सेंधवा तालुक्यातील जुलवानिया येथील असल्याचे निष्पन्न झाले होते. विशेष पथकाने या भागात दोन दिवस वेषांतर करीत पाळत ठेवली व आरोपी बाहेर निघताच त्यांच्या मुसक्या आवळल्या. ओळख परेड बाकी असल्याने त्यांचे नाव जाहीर करण्यात आले नाही.
यांनी केली कारवाई
जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक् दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हवालदार गणेश शिरसाळे, पोलीस नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, छगन तायडे, किरण पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी, राजश्री बाविस्कर यांनी ही कारवाई केली.
कुविख्यात आरोपींविरोधात ठिकठिकाणी गुन्हे
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक, उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन, नंदुरबार शहर पोलीसस ठाण्याच्या हद्दीत दोन अशा एकूण पाच गुन्ह्यात हे संशयित पसार असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. संशयितांकडून 40 हजार रुपयांची मंगलपोत जप्त करण्यात आली.


