वरणगावात भीषण पाणीटंचाई : भाजपाचा मुख्याधिकार्‍यांना घेराव

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाची पायमल्ली : माजी नगराध्यक्ष सुनील काळेंचा आरोप


Severe water shortage in Varangaon : BJP surrounds the Chief Executive भुसावळ : वरणगाव शहरात 12 ते 13 दिवसाआड पाणी येत असल्याने भर उन्हाळ्यात नागरीकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईचा प्रश्न तातडीने निकाली निघावा, नारी मळा व शिवाजी नगराची नवीन जलकुंभ तातडीने सुरू करावा तसेच फिल्टर प्लांटवर टाकलेली रेती बदलवा अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी करीत वरणगाव मुख्याधिकार्‍यांना दोन तास घेराव घातला. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी पाणी प्रश्न सोडवण्याचे आदेश दिल्यानंतरही प्रशासन या आदेशाची पायमल्ली करीत असल्याचा आरोप आंदोलनकांनी केला.

यांची होती उपस्थिती
मुख्याधिकार्‍यांना घेराव घालताना माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, कामगार नेते मिलिंद मेढे, मिलिंद भैसे, तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर, भाजपा अध्यक्ष सुनील माळी, महिला मोर्चा अध्यक्ष प्रणिता पाटील, हाजी फहिम शेख, डॉ.सादिक शेख, डॉ.नाना अनिल वंजारी, नाना चौधरी, हितेश चौधरी, चांदणे, अंकुश साबळे, नीता तायडे, अनिल कुसुंबे मुस्लिम भाई, मुस्लिम अन्सारी, समाधान कोळी यांच्यासह असंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.


दोन तास मुख्याधिकार्‍यांना घेराव
मुख्याधिकारी सचिन राऊत यांना दोन तास घेराव घालून आंदोलकांनी ठिय्या मांडला. वरणगाव शहरातील पाणी समस्या मिटवण्यात यावी अन्यथा 8 एप्रिल रोजी मोठा नागरिकांचा मोर्चा आणण्यात येईल, असा इशारा माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिला. यावेळी मुख्याधिकारी सचिन राऊत यांनी तातडीने पाणीपुरवठा कर्मचार्‍यांची बोलावत वरणगाव शहरातील पाणी समस्या मार्गी लावण्याच्या सूचना यावेळी दिल्या. पाणीपुरवठा अभियंता एस.एम.पवार, मुक्तार भाई, निलेश झांबरे, वासू भोई, सुभाष जोहरे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाची पायमल्ली
माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण होत असून नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले. गत आठवड्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे यांनी वरणगावात बैठक घेत संबंधित अधिकार्‍यांना पाणी समस्या मार्गी लावण्याचे आदेश दिले मात्र त्या आदेशाची पायमल्ली नगरपरिषद प्रशासन करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !