आमदार एकनाथराव खडसे सोमवारी भाजपात करणार प्रवेश ! : पंतप्रधानांच्या उपस्थितीत चंद्रपूरात होणार सोहळा
MLA Eknathrao Khadse will join BJP on Monday ! : The ceremony will be held in Chandrapur in the presence of the Prime Minister भुसावळ : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे भाजपात घरवापसी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. खुद्द आमदार खडसे यांनीच या निर्णयाची पुष्टी केली आहे. आमदार खडसे यांचा प्रवेश हा सोमवार, 8 एप्रिल रोजी निश्चित झाल्याची माहिती आहे. सोमवारी चंद्रपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार दौर्यासाठी येत आहेत व प्रचार सभेत हा प्रवेशाचा सोहळा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आमदार एकनाथ खडसे यांची भाजपात घरवापसी झाल्यास उत्तर महाराष्ट्रातल्या जागांवर भाजपला उमेदवारांना निवडून आणण्यास मोठी मदत होणार आहे.
दिल्लीवारीत सर्व काही ठरले
काही दिवसांपूर्वी आमदार एकनाथराव खडसे हे खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत दिल्ली येथे गेले होते. यावेळी वरीष्ठ नेत्यांसोबत त्यांची बैठक झाली व अनेक राजकीय विषयांवर त्यांची चर्चा झाली व त्याचवेळी आमदार खडसे यांचा भाजपात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

होय स्वगृही परततोय : आमदार एकनाथ खडसे
शनिवारी आमदार एकनाथराव खडसे यांनी आपल्या घरवापसीवर शिक्कामोर्तब केले. आमदार खडसे ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ शी संवाद साधताना म्हणाले होते की, भाजपा हे घर असून ते मी ‘बांधले आहे. या घराच्या पायापासून माझे योगदान आहे. माझ्या घरातून मी नाराजीमुळे मी बाहेर पडलो मात्र आता माझी नाराजी दूर झाली आहे व आठ दिवसात मी माझ्या हक्काच्या घरात परतत आहे. लवकरच आपण आपल्या घरी जाणार असून त्याबाबतची घोषणा आपण जाहीरपणे करू.
मंत्री गुलाबराव पाटलांनी केले निर्णयाचे स्वागत
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार एकनाथराव खडसे यांच्या भाजपात परतण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. आमदार खडसे हे मूळ विचारधारेत परतत असल्याने आम्ही त्यांचे स्वागत करू व त्यांनी आमच्यावर टिका केली असलीतरी ती टिका आम्ही विसरून जावू.
अॅड.रोहिणीताई खडसे राष्ट्रवादीत राहणार !
नाथाभाऊंच्या भाजपा प्रवेश करीत असलेतरी त्यांच्या कन्या अॅड.रोहिणी खडसे मात्र राष्ट्रवादीत राहून तुतारीचा प्रचार करणार आहेत. आगामी काळात विधानसभा निवडणुका असल्याने मुक्ताईनगरची जागा युतीतील शिंदे गटाकडे आहे त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांना फाईट देण्यासाठी कदाचित हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.




