प्रवाशांना दिलासा : मध्य रेल्वेतर्फे उन्हाळी विशेष गाड्या चालवणार !

Relief for passengers: Central Railway will run summer special trains! भुसावळ : आगामी उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांना होत असलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यात मुंबई-मऊ, पुणे दानापूर, नागपूर पुणे या गाड्या चालविणार आहे. या विशेष गाड्यांच्या 54 फेर्या चालविल्या जाणार आहे. यामुळे भुसावळ विभागातील प्रवाशांना या गाड्यांचा लाभ मिळणार आहे.
विशेष गाड्यांच्या 54 फेर्या होणार
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मऊ विशेष या गाडीच्या चार फेर्या होणार आहे. विशेष गाडी बुधवार, 10 एप्रिल आणि 1 मे या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रात्री 10.35 वाजता सुटेल आणि मऊ येथे तिसर्या दिवशी सकाळी 11.10 वाजता पोहोचेल. या गाडीच्या दोन फेर्या होतील. 01080 ही विशेेष गाडी शुक्रवार, 12 12 एप्रिल आणि 3 मे या दिवशी मऊ येथून दुपारी 1.30 वाजता सुटेल. या गाडीच्या दोन फेर्या होतील. या गाडीला विभागात नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा येथे थांबे आहे. पुणे, दानापूर या विशेष गाडीच्या आठ फेर्या होतील. यात 01471 विशेष गाडी गुरूवार आणि रविवार, 11 व 14 एप्रिल 2 व 5 या दिवशी पुणे येथून सकाळी 6.30 वाजता सुटेल. 01472 ही विशेष गाडी शुक्रवार व सोमवार, 12, 15 एप्रिल आणि 3 व 6 मे या दिवशी दानापूर येथून दुपारी 1.30 वाजता सुटेल. या गाडीच्या चार फेर्या होतील. ही गाडी विभागात मनमाड, भुसावळ व खंडवा येथे थांबेल. नागपूर पुणे या मार्गावर सुध्दा विशेष गाडी चालविली जाणार आहे, या गाडीच्या 19 फेर्या होतील. 01165 विशेष गाडी सोमवार व शनिवार, 13 एप्रिल ते 15 जून या काळात नागपूर येथून संध्याकाळी 7.40 वाजता सुटेल व पुण्यात दुसर्या दिवशी सकाळी 11.25 वाजता पोहोचणार आहे. 01166 ही विशेष गाडी मंगळवार व रविवार, 14 एप्रिल ते 16 जून या काळात पुणे येथून दुपारी 3.50 वाजता सुटेल. नागपूरला दुसर्या दिवशी सकाळी 6.30 वाजता पोचेल. या गाडीच्या 19 फेर्या होतील. ही गाडी विभागात बडनेरा, अकोला, शेगांव, मलकापूर, भुसावल, मनमाड येथे थांबा देण्यात आला आहे.


