निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य : भुसावळातील चौघांचा प्राईड पुरस्काराने सन्मान

भुसावळ रोटरी रेलसिटीचा उपक्रम : सात वर्षांपासून उपक्रम


Social work with selfless spirit: Four from Bhusawal honored with Pride Award भुसावळ : निस्वार्थ भावनेने समाजसेवेत झोकून समाजसेवेचे कार्य करणार्‍या भुसावळातील चौघा मान्यवरांचा रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीने ‘भुसावळ प्राईड’ हा पुरस्कार देऊन सन्मान केला. गेल्या सात वर्षांपासून हा पुरस्कार दिला जात आहे. ज्यांनी स्वतःची आवड म्हणून किंवा समाजातील उणीवा दूर करण्यासाठी स्वबळावर समाजसेवा सुरू करीत कुठलाही प्रसिद्धीचा गाजावाजा केला नाही अशा मान्यवरांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर अध्यक्ष मनोज सोनार आणि सचिव तेजस नवगाळे होते. यावेळी पुरस्कारार्थी सहपरिवार तर एकूण 35 रोटरी सदस्य परिवारासह उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप जोशी आणि सुमंत अग्रवाल यांनी केले. भुसावळ प्राईड अवॉर्डचे संचालन अतिशय ओघवत्या आणि भावनिक शैलीत प्रोजेक्ट चेअरमन सोनू मांडे यांनी तर प्रमुख पाहुणे यांचा परिचय सुमित चोरडिया यांनी तर आभार प्रदर्शन मयूर क्रुपलानी यांनी मानले. रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल आशा वेणुगोपाल यांच्याहस्ते हा पुरस्कार देण्यात आला. सन्मानित व्यक्तींचा आदर्श घेऊन रोजचा दिवस आपल्याला आणखी एक बोनस आयुष्य मिळाले आहे, असे समजून आपण समाजाला वाहून घेतले पाहिजे, असा महत्वपूर्ण संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला


प्राईड पुरस्काराचे मानकरी
रेल्वेचे सेवानिवृत्त सेक्शन इंजिनिअर विजयसिंग राजपूत यांनी बेवारस व निराधार श्वानांची सेवा केली तर रेल्वे लोको पायलट विजयकुमार द्विवेदी यांनी वृक्षरोपण आणि संवर्धन तर महेंद्र गेंदिलाल माळी उर्फ भोला यांनी गरिबांना अन्नदान तसेच कंत्राटदार योगेश पाटील यांना अनोळखी व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांचा योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार केले. या सर्व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना ‘भुसावळ प्रॉईड’ पुरस्काराने गौरविण्यात आले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !