सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात मोठ्या उत्साहात चैत्र नवरात्रोत्सवाला सुरवात
Chaitra Navratri festival begins with great enthusiasm in Satpuda resident Ai Manudevi temple यावल : यावल तालुक्यातील आडगाव जवळील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या श्री क्षेत्र सातपुडा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात मोठ्या उत्साहात चैत्र नवरात्रोत्सवाला मंगळवारपासून सुरूवात झाली आहे. पारंपरिक पध्दतीने घटस्थापना करण्यात आली तर संपूर्ण नऊ दिवस येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी हजारो भाविकांनी श्री क्षेत्रावर येवून दर्शन घेतले.
विधीवत घटस्थापना
आडगावख ता.यावलपासून सातपुड्याच्या कुशीत खान्देश कुलस्वामिनी सातपुडा निवासिनी आई मनुदेवीचे मंदिर आहे. सातपुड्याच्या निर्सगरम्य वातावरणात स्थित या मंदिरावर दरवर्षी चैत्र नवरात्रोत्सव साजरा होतो. या अनुषंगाने यावर्षी देखील मंगळवारी श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिरात घट स्थापना कार्यकम पार पडला. पूजेसह घटस्थापनेचा मान आडगाव येथील पुरुषोत्तम पाटील व निकिता पुरुषोत्तम पाटील तसेच जळगाव येथील भूषण चौधरी व हर्षल भूषण चौधरी या दाम्पत्यांस देेण्यात आला. त्यांच्याहस्ते विधीवत घटस्थापना पार पडली. हा संपूर्ण धार्मिक कार्यक्रम व घटस्थापनेची पूजा पुरोहित कुंदन धर्माधिकारी व दगडू महाराज यांनी पार पाडली. याप्रसंगी मंदिर संस्थानचे अध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी प्रभाकर पाटील, नितीन भास्कर पाटील, ज्ञानेश्वर नारायण पाटील, सुनील महाजन, सोपान वाणी, एन.डी.चौधरी, सतीष पाटील, महेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती. मंदिरात संपूर्ण धार्मिक विधी करीता समाधान कोळी, गोपाल पाटील, जालम पाटील, महेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.





