भोटा शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिलूला जीवनदान
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा शिवारात बिबट्याचे पिल्लू विहिरीत पडल्याने दुसर्या दिवशी सकाळी वनविभागाने शर्थीचे प्रयत्न करीत सुखरूप बाहेर काढले. गुरुवार, 18 रोजी भोटा शिवारातील गट नंबर 168/2/2 सचिन शर्मा यांच्या शेतात सकाळी मजूर काम करण्यासाठी केले असता त्यांना विहिरीमध्ये गुरगुरण्याचा आवाज आला. त्यावेळी मजुरांनी विहिरीत डोकावून पाहिले असता विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडलेले दिसले. त्यांनी लगेचच शेत मालक सचिन शर्मा यांना माहिती दिली.
सचिन शर्मा यांनी तत्काळ वन विभागाकडे माहिती दिल्यानीं वन कर्मचारी दाखल झाले. सहा महिने वय असलेल्या छाव्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
पशू वैद्यकीय अधिकारी रामदास जाधव व वनविभागाच्या निगराणीत पिलू नेण्यात आले. भोटा शिवारातील कंपार्टमेंटमध्ये वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पुनर्मिलनासाठी अनुभवाने बिबट्या मादीची अचूक जागा हेरत छाव्याला तिथे सोडले. मुख्य वनसंरक्षक नितु सोमाराज (धुळे), उपमुख्य वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक यू.एम.बिराजदार, वनपरिक्षेत्र अधिकारी परिमल साळुंखे, कुर्हा वनपाल पाचपांडे, राजुरा वनरक्षक ए.एस.मोरे यांनी बिबट्याच्या पिलूला बाहेर काढत मातेजवळ सोडले.