मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही : महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील


मलकापूर :  रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी मलकापूर तालुक्यातील नागरिकांशी सोमवारी संवाद साधला. या मतदार संघातील नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे सांगत त्यांनी महाविकास आघाडीला एक वेळा मतदानातून संधी देण्याचे भावनिक आवाहन केले. यावेळी मतदारसंघातील अडी-अडचणीदेखील त्यांनी मतदारांशी बोलताना जाणून घेतल्या.

यांची होती उपस्थिती
मलकापूर विधानसभा मतदारसंघातील श्री धुपेश्वर महादेव मंदिरात उमेदवार श्रीराम पाटील यांनी दर्शन घेतले. यावेळी मलकापूरचे आमदार राजेश एकडे यांच्याहस्ते प्रचार नारळ वाढवून प्रचारास सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे अ‍ॅड.रवींद्र पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरविंद कोलते, एस.एस.मोरे, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष रशीदखा जमादार, हरिष रावळ, शाम राठी, संतोष रायपूर, मोहन पाटील, शिवसेना संघटक राजेशसिंग राजपूत, काँग्रेस महिला अध्यक्ष मंगला पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष वनिता पाटील, राजू पाटील, अरुण अग्रवाल, बंडूभाऊ चौधरी, गजानन ठोसर, ईश्वर राहणे (मुक्ताईनगर), अनिल अहुजा, दीपक चांभारे , डोरले, सोपान शेलकर, लखन कुरेशी, प्रवीण पाटील, अ‍ॅड.बंगाळे, विलास कांडेलकर यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !