वंचित आघाडीचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांचा मुक्ताईनगरात प्रचार दौरा

मतदारांशी साधला संवाद : रावेर लोकसभा मतदारसंघ विकासाचे मांडले व्हिजन


मुक्ताईनगर : वंचित बहुजन आघाडीचे रावेर लोकसभेचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक गावांना प्रचार दौरा केला. अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. मतदारसंघाचे व्हिजन त्यांनी यावेळी मतदारांजवळ मांडले. वंचित आघाडीच्या उमेदवाराला एक वेळ संधी देण्याचे आवाहन उमेदवार संजय ब्राह्मणे यांनी यावेळी केले.


या गावांमध्ये प्रचाराचा झंजावात
रावेर लोकसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय पंडित ब्राह्मणे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी, कुर्‍हाकाकोडा, व्हायला, डोलारखेडा, चिंचखेडा आदी गावांमध्ये प्रचार दौरा करीत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.

यांची होती उपस्थिती
वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे, महासचिव योगेश तायडे, महिला महासचिव वंदना आराक, जिल्हा सचिव विश्वनाथ मोरे, जिल्हा संघटक ईश्वर लहासे, तालुकाध्यक्ष दिलीप पोहेकर, युवा संघटक अजय कोगळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !