मलकापूर तालुक्यात खासदार रक्षाताई खडसेंनी मतदारांशी साधला संवाद
मलकापूर : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तिसर्यांदा निवडून देण्यासाठी भाजपाला मतदान करा, असे आवाहन रावेर लोकसभेतील भाजपा उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी शुक्रवारी मलकापूर मतदारसंघात केलेल्या प्रचारदौर्यात केले.
या गावांमध्ये केला प्रचार दौरा
रावेर लोकसभा महायुती व भाजपाच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी मलकापूर तालुक्यातील मौजे देवधाबा, हिंगणाकाजी, भालेगाव, नरवेल, धरणगाव, झोडगा, हरसोळा, वडोदा, बेलाड आदी गावांमध्ये शुक्रवारी प्रचार दौरा केला.

भाजपाला मतदानाचे आवाहन
सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये रावेर लोकसभा क्षेत्र भाजपा व महायुतीच्या अधिकृत उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी माजी आमदार चैनसुख संचेती, शिवाभाऊ तायडे तसेच मलकापूर तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे आदी मित्र पक्षातील पदाधिकारी यांच्यासह मलकापूर तालुक्यात प्रचार दौरा केला. मलकापूर तालुक्यातील मौजे देवधाबा, हिंगणाकाजी, भालेगाव, नरवेल, धरणगाव, झोडगा, हरसोळा, वडोदा, बेलाड ई. गावांमध्ये प्रचारार्थ भेट देऊन, मतदारांशी संवाद साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसर्यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी जास्तीत-जास्त संख्येने भाजपाला मतदान करण्याचे यावेळी आवाहन केले.





