दहा वर्षात जनतेसाठी काय केले हे जनतेला सांगा : भुसावळात माजी कृषि मंत्री शरद पवारांची पंतप्रधानांवर टिका

भाजपा सरकारवर जोरदार टिका : उमेदवार श्रीराम पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन


भुसावळ : आम्ही शेतकर्‍यांसाठी काय केले असे मोदी आम्हाला विचारतात मात्र त्यांनी दहा वर्षात काय केले हे आता जनतेला सांगावे, अशी टिका माजी कृषि मंत्री व शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भुसावळात केली. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सायंकाळी भुसावळातील संतोषी माता सभागृहात जाहीर मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते.


दहा वर्षात महागाई दुपटीने वाढली
माजी कृषि मंत्री शरद पवार आपल्या शैलीत म्हणाले की, या निवडणुकीकडे देशाचे नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत तुमच्या-आमच्या सारख्या लोकांचा समुदाय एकीकडे तर दुसर्‍या बाजूला ज्यांच्याकडे दहा वर्ष ज्यांची सत्ता होती ते लोक उभे आहेत. 2014 मध्ये ज्यावेळी मोदी यांनी मते मागितली त्यावेळी त्यांनी महागाईच्या नावावर मते मागितली. त्यांनी दहा वर्षातील लेखाजोखा जनतेपुढे मांडावा, असेही पवार म्हणाले.

यांची विचार मंचावर उपस्थिती
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार श्रीराम पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, प्रतिभा शिंदे, यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !