रावेर रेशन प्रकरण : तिघा आरोपींना अटक


रावेर- राज्यभर गाजत असलेल्या सुमारे 38 लाखांच्या अवैध रेशन धान्यसाठा प्रकरणातील तिघा आरोपींना सोमवारी अटक केल्यानंतर रावेर न्यायालयात हजर केले असता आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 14 ऑगस्ट रोजी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांच्या छाप्यानंतर रेशन दुकानदार व महसूल विभागाच्या अधिकार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली. तब्बल चार दिवसानंतर सोमवारी पहाटे गोपनीय माहितीच्या आधारावर संशयीत आरोपी सुनील नेवे उर्फ बाळू नेवे (चुंचाळे, ता.यावल) व विलास चौधरी (रा.रावेर), योगेश पाटील यांना अटक करण्यात आली. सोमवारी दुपारी रावेर न्यायालयामध्ये आरोपींना हजर केल्यानंतर त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


कॉपी करू नका.