खासदार रक्षाताई खडसेंच्या प्रचारार्थ भुसावळातील प्रभाग 22 मध्ये आज प्रचार दौरा


भुसावळ : भारतीय जनता पार्टी महायुतीच्या रावेर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 22मध्ये भुसावळ तालुक्याचे आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार दौरा रविवारी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे. जय मातृभूमी चौक, प्रोफेसर कॉलनीतून प्रचाराला सायंकाळी सुरूवात होईल.

पदाधिकार्‍यांना उपस्थितीचे आवाहन
प्रचारात भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, आघाडी-मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, जिल्हा चिटणीस खुशाल जोशी, शहराध्यक्ष युवराज लोणारी, बुथ विस्तारक रमाशंकर दुबे, सरचिटणीस संदीप सुरवाडे, श्रेयस इंगळे, युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव आवटे यांनी केले आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !