खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ आज भुसावळात प्रचार रॅली
भुसावळ : रावेर लोकसभेतील महायुतीतील भाजपाच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ शनिवार, 11 रोजी दुपारी साडेतीन वाजता भुसावळ शहरातून विराट प्रचार रॅली काढण्यात येणार आहे.
जामनेर रोडवरील खासदार रक्षाताई यांच्या प्रचार कार्यालयापासून प्रचार रॅली काढण्यात येणार आहे. खासदार रक्षाई खडसे व आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत निघणार्या रॅलीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा पदाधिकार्यांनी केले आहे.





