नांदुर्यात खासदार रक्षाताई खडसेंच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदुरा : रावेर लोकसभेतील महायुती व भाजपा उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ माजी आमदार चैनसुख संचेती, डॉ.संजय कुटे व उमा तायडे यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार नांदुरा शहरातून काढण्यात आली. या रॅलीला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


भाजपाला मतदानाचे आवाहन
सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये रावेर लोकसभा क्षेत्र भाजपा व महायुती अधिकृत उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ नांदुरा शहर येथे तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे ई. मित्र पक्षाच्या वतीने प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी मतदारांना अभिवादन करून विरोधकांच्या कोणत्याही भुलथापांना बळी न पडता प्रधानमंत्रीनरेंद्र मोदीजी यांना सलग तिसर्यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी 13 रोजी भाजपाला मतदानाचे आवाहन करण्यात आले.




