भुसावळात श्रीराम पाटील यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

रावेर लोकसभेत परिवर्तन होणार : माजी आमदार संतोष चौधरी यांचा विश्वास


Spontaneous response to Shriram Patil’s rally in Bhusawal भुसावळ : रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ भुसावळात शनिवारी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीला शहरातील तसेच तालुक्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली. भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम पाटील यांना भुसावळ तालुक्यातून मताधिक्याने विजयी करण्याचे आश्वासन यावेळी संतोष चौधरी यांनी देत परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास व्यक्त केला.

प्रमुख मार्गावरून निघाली रॅली
शेतकरी व सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणार्‍या भाजप सरकारला उलथवून टाकण्यासाठी माजी आमदार संतोष चौधरी यांनी सुरवाती पासूनच परिवर्तनाचा नारा दिला आहे. भुसावळ येथील अष्टभुजा देवीचे दर्शन घेत मंदिरापासून रॅलीला सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. यावेळी रावेरचे आमदार शिरीष चौधरी, भुसावळचे माजी आमदार नीलकंठ फालक, दलित नेते जगन सोनवणे, हाजी सलीम साहेब, मुनवर खान, प्रा.उत्तम सुरवाडे, सचिन चौधरी यांच्यासह महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उबाठा) गट तसेच मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकार्ये व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !