भुसावळात भाजपाच्या प्रचार रॅलीला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद


भुसावळ : रावेर लोकसभा महायुती व भाजपाच्या उमेदवार खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी निघालेल्या भव्य प्रचार रॅलीला भुसावळकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


भाजपाला मतदानाचे आवाहन
सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये रावेर लोकसभा क्षेत्र भाजपा व महायुतीच्या अधिकृत उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ भुसावळ शहरातून दुपारी चार वाजता जामनेर रोडवरील प्रचार कार्यालयापासून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. खासदार खडसे व आमदार सावकारे यांनी मतदारांना अभिवादन करून विरोधकांच्या कोणत्याही भुलथापांना बळी न पडता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सलग तिसर्‍यांदा प्रधनमंत्री बनविण्यासाठी मतदानाचे आवाहन केले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !