आमदार एकनाथराव खडसेंची मोठी घोषणा : यापुढे निवडणूक लढवणार नाही !


MLA Eknathrao Khadse’s big announcement: He will no longer contest elections! मुंबई : भाजपाच्या प्रवेशाच्या वाटेवर असलेले आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानसभा वा लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे मात्र राजकीय निवृत्ती घेतली नसल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. शरद पवारांनी आपल्याला आमदारकी दिली असल्याने राजीनामा देण्याचा प्रश्न नाही व लवकरच आपला भाजपात प्रवेश होईल, असेदेखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

राजकीय निवृत्ती नाही मात्र निवडणूक लढणवणार नाही
खडसे म्हणाले की, मी विधान परिषदेचा आमदार आहे. शरद पवारांनी आम्ही दिलेली वस्तू परत घेत नाही, असे स्पष्ट केल्याने आमदारकीचा राजीनामा देण्याचा प्रश्न नाही मात्र इतर लोकं माझा विधान परिषदेचा राजीनामा मागत असतील तर मला त्याच्याशी देणंघेणं नाही. मी राजकीय माणूस आहे. मी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही. राजकारणात पुढे काहीही होऊ शकते, मात्र, आता माझा निवडणूक लढवण्याकडे कल नाही. शरद पवारांना पक्ष सोडताना काय सांगितले, हे आता सांगणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.


भाजपा प्रवेश होणारच !
भाजपा प्रवेशाविषयी खडसे म्हणाले की, माझा भाजपमध्ये प्रवेश हा निश्चित असून तसे विनोद तावडे यांनी स्पष्ट केल्याने मी निश्चित आहे. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील व देवेंद्र फडणवीस या तिघांचा आता विरोध नाही व त्यांचा नाराजीचा सूर होता मूळात विरोध नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !