लोकसभा निवडणूक : जळगावसाठी 51.98 तर रावेरसाठी 55.36 टक्के मतदान
जळगाव : लोकशाहीतील सर्वात मोठ्या उत्सवासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. जळगावसह रावेर लोकसभेसाठी सोमवार, 13 मे रोजी होत असलेल्या निवडुणकीत अनेक मतदान केंद्रावर सकाळपासून गर्दी आहे तर काही मतदान केंद्रावर मात्र संथगतीने मतदारांचा प्रतिसाद लाभत आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार सकाळी 7 ते दुपारी वाजे पर्यंत जळगाव लोकसभेसाठी 51.98 तर रावेरसाठी 55.36 टक्के मतदान झाले.
जळगाव लोकसभा मतदारसंघ- 51.98 %
विधानसभानिहाय टक्केवारी खालील प्रमाणे
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ- 49.50 %
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ- 55.79 %
अमळनेर विधानसभा मतदारसंघ- 47.40 %
एरंडोल विधानसभा मतदारसंघ- 55.84 %
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ- 50.37 %
पाचोरा विधानसभा मतदारसंघ- 53.90 %

रावेर लोकसभा मतदारसंघ- 55.36 %
विधानसभानिहाय टक्केवारी खालील प्रमाणे
चोपडा विधानसभा मतदारसंघ- 55.99 %
रावेर विधानसभा मतदारसंघ- 56.85%
भुसावळ विधानसभा मतदारसंघ- 52.70 %
जामनेर विधानसभा मतदारसंघ- 54.63 %
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ- 53.20 %
मलकापुर विधानसभा मतदारसंघ- 59.10 %




