भुसावळात ‘आठवणीतले माहेर’ कार्यक्रमात रमल्या सखी

प्रतिष्ठा महिला मंडळाचा उपक्रम : विविध स्पर्धांचे आयोजन


In Bhusawal, Sakhi was engaged in the program ‘Athwaneetle Maher’ भुसावळ : अक्षयतृतीयेला सासरवाशीन माहेरी येते व माहेरच्यांसोबत रमते, झोके खेळते, माहेरी आंब्याचा रस, पुरणाची पोळी, कुरडई-पापड यांचा मनसोक्त आस्वाद घेते मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे हे सगळे चित्र आता तसे दुर्मीळ झाले मात्र प्रत्येक महिलेच्या मनातील माहेरची आठवण जिवंत राहून तिला माहेरची उणीव भासू नये म्हणून येथील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे अक्षयतृतीया निमित्त ‘आठवणीतले माहेर’ या कार्यक्रमाचे आयोजन स्टार लॉनमध्ये करण्यात आले. गिरीश कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.

विविध स्पर्धांचे आयोजन
महिलांना सजवलेल्या बैलगाडीतून कार्यक्रमस्थळी आणण्याची व्यवस्था करण्यात आली. सर्व महिलांसाठी आंब्याचा रस, पुरणाची पोळी, आमटी, कुरडई, पापड यांचे जेवण देण्यात आले. मनसोक्त आस्वाद तसेच सर्व सवाष्ण महिलांना हळदीकुंकू देवून ओटी भरण्यात आली. कार्यक्रमस्थळी बैलगाडी, झोके व वेगवेगळे सेल्फी पॉईंटची व्यवस्था करण्यात आली. विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. नृत्य स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा (ऐतीहासिक महान स्त्रिया), निबंध स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, भारतीय नववधू स्पर्धा, संगीत खुर्ची तसेच वेगवेगळे गेम्स ठेवण्यात आले ज्यात महिला उत्साहाने सहभागी झाल्या.. लकी ड्रॉद्वारे तीन महिलांना कस्तुरी साडी सेंटरतर्फे पैठणी देण्यात आली.


यांची कार्यक्रमास उपस्थिती
गणेश पूजन व गौर पूजन आमदार संजय सावकारे यांच्या मातोश्री सुशीलाबाई सावकारे, मुकेश खपली, गिरीश कुलकर्णी, रजनी जैन यांच्याहस्ते करण्यात आले. नुपूर रमाकांत भालेरावने नृत्य सादर केले. सुनिधी सावकारे व श्रेया टेकाडे यांनी कृष्णलीलावर आधारित नृत्य सादर केले. या कार्यक्रमात विविध संस्थांचे अध्यक्ष, नगरसेविका, पंचायत समितीचे माजी सभापती, सरपंच यांची उपस्थिती लाभली. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या सदस्यांनी अक्षयतृतीयाचे महत्व, पारंपरिक खेळ झिम्मा, फुगडी तसेच सासरवाशीन महिलेचे रुसवे-फुगवे सादर करीत उपस्थितांचे मन जिंकले. परीक्षक म्हणून मुकेश खपली, रजनी जैन, राजेश्री देशमुख, अनिता आंबेकर लाभले. सूत्रसंचालन राजेश्री देशमुख यांनी केले.
यशस्वीतेसाठी मंडळाच्या सदस्य लता सोनवणे, अनिता आंबेकर, सोनल महाजन, वैशाली सैतवाल, राजेश्री देशमुख, वैशाली भगत, जयश्री चौधरी, वैशाली महाजन, वर्षा लोखंडे, राजश्री बादशाह, सारीका भारंबे यांनी परिश्रम घेतले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !