तुटलेली मने जोडणे गरजेचे, त्यासाठी पुढाकार घेतल्याचा आनंद : भरत महाराज

भोरगांव लेवा पंचायत समन्वय समितीचे उद्घाटन


It is necessary to connect broken hearts, the joy of taking the initiative : Bharat Maharaj भुसावळ : समाजात किरकोळ कारणावरून आपसातच मने तुटत आहे, नुकतेच झालेले विवाह सुध्दा किरकोळ कारणावरून तुटत आहे, तुटलेली मने जोडणे आवश्यक आहे, त्यासाठी पुढाकार घेतला हे खरोखरच आनंदास पात्र आहे, असे प्रतिपादन भरत महाराज यांनी केले. जामनेर रोडवरील सोनिच्छावाडी येथे सकल लेवा पाटीदार समाजाच्या समन्वय समितीचे भरत महाराज यांच्याहस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते.

समाजातील मान्यवरांची उपस्थिती
भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया पाडळसे समन्वय समितीचे उदघाटन मंगळवारी करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात समाजातील मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ललित रमेश पाटील होते. नूतन समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून सुहास चौधरी यांचे नाव सर्वानुमते जाहीर करण्यात आले. सुहास चौधरी यांनी प्रास्ताविक केले त्यात त्यांनी समन्वय समितीचा उद्देश व योजना याबद्दल माहिती दिली. फक्त वैवाहिक आयुष्यातील अडचणींबरोबर समाजातील लहान मुली, शैक्षणिक अडचणी, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक यासाठी कार्य करण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


समितीच्या माध्यमातून समाज जुळणार
भरत महाराज यांनी सांगितले की, समाजकार्यात तुटलेली मन जोडणे आवश्यक आहे, ही कामे या समितीच्या माध्यमातून होतील, यातून समाज जुडला जाणार आहे. यावेळी समुपदेशक आरती चौधरी यांनी सांगितले की, जेव्हा समाजासाठी काही चांगलं करण्याची इच्छा मनापासून होते, तेव्हा समजावे की माणुसकी अजूनही जिवंत आहे. याच माणुसकीच्या नात्यातून आज या समन्वय समितीचा शुभारंभ येथे झाला आहे. अखिल भारतीय लेवा संघाचे अध्यक्ष अरुण बोरोले यांनी सांगितले की, सर्वांनी एकत्र येऊन कार्य करणे आवश्यक आहे.

समितीच्या माध्यमातून विदारक चित्र बदलणार
नरेंद्र नारखेडे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, सामाजिक समस्या, अडचणी, सोडवण्यासाठी काम करावे लागेल. अनेक तरुणांची लग्न होत नाही, मुली मिळत नाहीत, व्यसन, बेरोजगारी वाढली आहे, हे समाजाचे विदारक चित्र आहे. समितीच्या मदतीने समस्या सुटतील अशी आशा आहे. माजी आमदार निळकंठ फालक यांनी नविन दृष्टीकोन व नवीन विचारांनी या समितीची स्थापना झाली आहे. कार्याची व्याप्ती मर्यादित राहणार नाही. एक चांगला उद्देश, ध्येय ठेवून, ही समिती कार्य करणार आहे. सूत्रसंचालन कावेरी चौधरी यांनी केले. यावेळी जळगाव, पाडळसे, सावदा, मस्कावद येथून अनेक समाजबांधवांची उपस्थिती होती.

समन्वय समितीची कार्यकारीणी
सुहास चौधरी (अध्यक्ष), निळकंठ फालक, सुभाषचंद्र भंगाळे, रघुनाथ गिरधर चौधरी, अरुण नारायण चौधरी, महेश फालक, हरीष फालक, परिक्षीत बर्‍हाटे, शरद फेगडे, आरती चौधरी, मंगला पाटील, कावेरी चौधरी, लालचंद पाटील, अनिल वारके, सुधाकर जावळे, धीरज पाटील, चंद्रकांत चौधरी, आमंत्रित सदस्य संजय पाटील, सुभाष झांबरे यांचा समावेश आहे.

यांची होती उपस्थिती
जोत्स्ना बर्‍हाटे, ज्योती महाजन, डॉ.प्रियदर्शनी सरोदे, सरला वारके, नीला चौधरी, गीता चौधरी, नीता वराडे, पूनम भरत पाटील, डॉ.मिलिंद पाटील, वा.पी.बर्‍हाटे, पी.व्ही.पाटील, किरण महाजन, अशोक चौधरी, प्रमोद नेमाडे,
नितीन भोळे, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, नीळकंठ भारंबे, दीपक फालक, गोविंदा ढाके, सुरेश जावळे, संजय पाटील, सुधीर बेंडाळे, जगदीश फिरके, मनोज जावळे, आर.एस.पाटील, प्रमोद सरोदे, किरण रमेश महाजन, निलेश भोळे, राजेंद्र मुरलीधर पाटील, उल्हास महाजन, प्रमोद सरोदे, नयना कीशोर ढाके, सीमा धीरज पाटील, उल्हास पाटील, स्नेहल बढे, पांडूरंग तळेले, उल्हास सदाशीव महाजन, पंढरीनाथ बोरोले, नीळकंठ रामदास भारंबे, सचिन प्रमोद भोळे, पंडीतराव कोल्हे, विनायक मामा पाचपांडे, उल्हास पाटील (वरणगाव) आदींची उपस्थिती होती.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !