फैजपूरातील शिव कॉलनीतील गटार खोदकामामुळे पाणीपुरवठा विस्कळीत
Water supply disrupted due to sewer digging in Shiv Colony in Faizpur फैजपूर : फैजपूर शहरातील शिवकॉलनी चौकात गटारीचे खोदकाम सुरू असल्याने पाणीपुरवळा विस्कळीत झाला आहे. जे.सी.बी.ने गटार खोदल्यानंतर नळ कनेक्शनचे पाईप तुटले परिणाम शिवकॉलनीत व नानाभाऊ मोची यांच्या घरकडील झोपडपट्टी भागात पाणीपुरवठा होवू न शकल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले. सकाळपासून महिला, मुले व सर्व गरीब मागासवर्गीय दलितबांधव, झोपडपट्टी धारक व शिवकॉलनील दलित बांधवांमधून रोष व्यक्त होत आहे.
पालिका प्रशासनाने दखल घ्यावी
सुुमारे 25 खाजगी लोकांची पाईप लाईन तुटल्याने पाणीपुरवठा प्रभावीत झाजा आहे. पाईप लाईन त्वरित जोडण्यासाठी संबंधित ठेकेदाराने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा आहे. फैजपूर मुख्याधिकारी व उपविभागीय अधिकारी, फैजपूर यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा समाजसेवक अशोक भालेराव व नाना भाई मोची यांनी दिला आहे.





