मुक्ताईनगर तालुक्यात तापमान वाढीमुळे केळी घडांचीही पडझड
मुक्ताईनगर : केळी उत्पादनासाठी मुक्ताईनगर तालुका प्रसिद्ध असून या भागात हजारो हेक्टरवर केळी पीक घेतले जाते. केळी उत्पादकांना लागवडीपासून ते कापणीपर्यंत लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात येतो. यासाठी शेतकरी वर्गाला कर्जदेखील काढावे लागते मात्र रणरणत्या उन्हासोबतच तापमानात वाढ झाल्याने केळी पिकावर याचा मोठा परिणाम झाला आहे. केळीची पाने करपलेली आहेत. उन्हामुळे पानांची गळती सुरू झाली आहे तर काही ठिकाणी पाण्याची पातळी घसरल्याने केळी पिकाला फटका बसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.





