दहिगावात बैलगाडा शर्यतीत मारूडच्या शेतकर्याने पटकावला प्रथम क्रमांक
प्रथमच विना पोलीस बंदोबस्तात झाली शर्यत : शेतकर्यांमध्ये प्रचंड उत्साह
यावल : यावल तालुक्यातील दहिगाव येथील 71-71 सरकार ग्रुपमार्फत गुरुवार, 16 मे रोजी भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले. यात 25 स्पर्धकांनी आपले नाव नोंदले होते. प्रामुख्याने मध्यप्रदेश, चोपडा, मुक्ताईनगर व जामनेर या भागातून शेतकरी शर्यतीत सहभागी झाले. शर्यतीत यावल तालुक्यातील मारूळ येथील शरीफ या शेतकर्याने प्रथम क्रमांक पटकाविला तर पहुर येथील सोनू पांढरे याने द्वितीय क्रमांक पटकाविला. तृतीय क्रमांक मोहरत, ता.चोपडा येथील मुद्याद अब्बास तडवी यांनी नंबर पटकावला
यांनी घेतले परिश्रम
प्रथम क्रमांक पटकावणार्यास पंधरा हजार रुपये किंमतीचे फ्रिज, द्वितीय क्रमांक विजेत्यास 12 हजार रुपये किंमतीचा एलईडी टीव्ही आणि तृतीय क्रमांक विजेत्याला सहा हजार रुपये किंमतीचे कुलर अशा स्वरूपात पंच कमिटी ग्रुप अध्यक्ष करण अरुण महाजन व 71-71 सरकार ग्रुप सदस्यांमार्फत वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी सरपंच अजय अडकमोल, समाधान चौधरीख दीपक पाटील, योगेश माळी, आनंद पाटील हे पंच होते. आयोजक म्हणून अजय पाटील, सचिन पाटील, निखील पाटील, पप्पू पाटील, भूपेंद्र कोळी, विपूल पाटील, राज पाटील, पारस महाजन, दिनेश पाटील, दीपक पाटील, दीपक कुंभार, जीवन महाजन, मयूर पाटील, विनोद पाटील, चेतन चौधरी, हेमंत पाटील यांचा समावेश होता. स्पर्धा शांततेत पार पाडण्यासाठी वरील सदस्यांनी परिश्रम घेतले. दुपारी 12.30 ते 4.30 दरम्यान ही स्पर्धा पार पडली. सायंकाळी पाच वाजता स्पर्धेचे विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

22 ते 25 वयोगटातील तरुणांचा सहभाग
या ठिकाणी आरोग्य दूत म्हणून स्थानिक आरोग्य सेवक उपस्थित होते. स्पर्धा 22 ते 25 वयोगटातील तरुणांनी यशस्वी करून दाखविली. स्पर्धेचे स्वरूप नऊ फेर्या नंतर तीन सेमी फायनल आणि शेवटची फायनल अशा स्वरूपात होते. स्पर्धेमध्ये दहिगाव, नायगाव, शिरसाड, साकळी, इच्छापू, मध्यप्रदेश, मुक्ताईनगर, कठोरा, मोहरक, ता.चोपडा, पहूर, ता.जामनेर, चोपडा येथील शेतकर्यांनी सहभाग घेतला. करन महाजन यांच्या शेतात ही स्पर्धा पार पडली. प्रथमच वर्ष असल्याने या स्पर्धेत प्रेक्षकांची मोठी उपस्थिती होती.




