धुळे जिल्ह्यात बनावट दारू कारखान्यावर कारवाई
चार लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त : संशयीत शेतमालक ताब्यात
Action taken against fake liquor factory in Dhule district धुळे : लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीत धुळ्यातील पश्चिम देवपूर पोलिसांनी वार शिवार, ता.धुळे येथे सुरू असलेल्या बनावट देशी दारूच्या कारखान्यावर छापेमारी करीत चार लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शेत मालकाला चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईनंतर बनावट दारू पुन्हा ऐरणीवर आली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश रेड्डी वार शिवारातील महेंद्र राजाराम चव्हाण यांच्या शेतातील घरात बनावट देशी दारुचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश पश्चिम देवपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना दिले. पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, कुणाल साळवे, पंडीत मोरे, सुनील राठोड, सनी सरदार, अतुल जाधव, किरण भदाणे, चालक अमोल सोनवणे, चालक वाल्मीक पाटील तसेच आझादनगरचे गौतम सपकाळ आदींनी शुक्रवारी रात्री एक वाजता छापा टाकून बनावट टॅन्गो पंच देशी दारू बनविण्याकरिता लागणारे साहित्य व बनावट टँगोपंचच्या बॉक्समध्ये भरलेल्या बाटल्या असा एकूण चार लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. शेत मालकाला चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असून कारखाना मालकाचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.





यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, कुणाल साळवे, पंडीत मोरे, सुनील राठोड, सनी सरदार, अतुल जाधव, चालक अमोल सोनवणे, किरण भदाणे, चालक वाल्मीक पाटील, आझादनगरचे गौतम सपकाळ यांनी केली.
