सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार जळगाव व रावेर लोकसभेत कोण विजयी होणार ? जाणून घ्या नेमकी बातमी
Who will win in Jalgaon and Raver Lok Sabha according to speculation market? Know the exact news जळगाव : जळगाव व रावेर लोकसभेची निवडणूक 13 मे रोजी अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडली. 4 जून रोजी निवडणूक निकाल समोर येणार असून तत्पूर्वी आता निकालाविषयी दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यातत जळगाव जिल्ह्यातील सट्टा बाजाराने जळगाव मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारावर 35 पैसे तर मविआच्या उमेदवारावर 55 पैशांचा भाव तर रावेर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारावर 30 पैसे तर मविआच्या उमेदवारावर 45 पैशांचा भाव ठरला आहे. याचाच अर्थ जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा भाजप जिंकणार असल्याचे दिसत आहे.
महायुतीच्या उमेदवारांना मिळणार यश
जळगाव मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारावर 35 पैसे तर मविआच्या उमेदवारावर 55 पैशांचा भाव तरला आहे. म्हणजेच महायुतीच्या उमेदवारावर एक लाख रुपये लावले आणि जर ते विजयी झाले तर एक लाख 35 हजार रुपये मिळतील, तर मविआच्या उमेदवारावर एक लाख रुपये लावले आणि ते जिंकले तर एक लाख 55 हजार रुपये सटोडींना मिळतील. अशाच पद्धतीने रावेर मतदा संघात महायुतीच्या उमेदवारावर 30 पैसे तर मविआच्या उमेदवारावर 45 पैशांचा भाव ठरला आहे.

सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार जळगाव मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जवळपास दोन लाख मतांच्या फरकाने तर रावेर मतदारसंघात दीड लाख मतांच्या फरकाने विजयी हाईल, असा अंदाज वर्तविला आहे. एकीकडे देशपातळीवर भाजपच्या जागा कमी होत असल्याची शक्यता सट्टा बाजाराने व्यक्त केली आहे. दुसरीकडे मात्र जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांवर भाजपच्या उमेदवारांना कौल दिला आहे. याबाबतचे वृत्त आज ‘दिव्य मराठी’ नुकतेच दिले आहे.