नांदेड ते हडपसर दरम्यान उन्हाळी विशेष गाडी धावणार !
भुसावळ : उन्हाळी हंगामात प्रवाशांच्या सेवेसाठी नांदेड ते हडपसर दरम्यान उन्हाळी गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नांदेड ते हडपसर दरम्यान उन्हाळी विशेष गाडीच्या 12 फेर्या होणार आहेत.
विशेष गाडीचा प्रवाशांना दिलासा
07623 विशेष नांदेड येथून 22 मे 26 जून दरम्यान दर बुधवारी 9 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी 11.20 वाजता हडपसर येथे पोहोचेल. 07624 विशेष हडपसर येथून 23 मे 27 जूनदरम्यान दर गुरुवारी 3.15 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी 04.30 वाजता नांदेड पोहोचेल. या गाडीला पूर्णा, परभणी, मनवट, सेलू, परतुर, जालना, औरंगाबाद, लासुर, रोटेगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन येेथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीला 13 वातानुकूलित तृतीय श्रेणी व सहा स्लीपर कोच असतील.





