आकर्षक मतदान केंद्र : सावदा न.पा.तृतीय क्रमांकाने सन्मानीत
सावदा : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये आकर्षक मतदान केंद्र तयार केल्याने सावदा नगरपरिषदेस जळगाव जिल्ह्यात तृतीय क्रमांकाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याहस्ते सन्मानीत करण्यात आले. सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्या संकल्पनेतून आकर्षक मतदान केंद्रावर बनाना सिटीची थीम करण्यात आली. यात अरुणा चौधरी व विनय खक्के आणि सावदा नगरपरिषदेच्या सर्व टीमने आकर्षक केंद्रासाठी परिश्रम घेतले.





