धुळे लोकसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत 28.73 टक्के मतदान
धुळे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सोमवार, 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून सुरुवात झाली. धुळे लोकसभा मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 28.73 टक्के मतदान झाले आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान असे-




धुळे ग्रामीण- 31.39 टक्के
धुळे शहर- 27.12टक्के
शिंदखेडा- 27.16 टक्के
मालेगांव मध्य- 33.28 टक्के
मालेगांव बाहृय- 26.00 टक्के
बागलाण- 27.45 टक्के