ईव्हीएम मशीनला हार घातला : शांतीगिरी महाराजांविरोधात गुन्हा
Defeated the EVM machine : A case against Shantigiri Maharaj नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी मतदान यंत्राला हार घातल्यानंतर सोशल मिडीयात व्हिडिओ व्हायरल झाला होता. निवडणूक प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेत महाराजांविरोधात नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केल्याने भाविकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान, हार घातल्यामुळे असा एखादा गुन्हा दाखल होतो, असे आपल्याला ठावूक नव्हते, असे शांतीगिरी महाराजांनी स्षट केले आहे.
सोशल मिडीयात व्हिडिओ व्हायरल
शांतीगिरी महाराज यांनी सोमवारी पहाटे त्रंबकेश्वरच्या मंदिरात पूजा विधी करत अभिषेक केला. मंदिरातील दर्शन झाल्यानंतर सकाळी सात वाजता त्यांनी त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान झाल्यावर स्वामी शांतिगिरी महाराजांनी ईव्हीएम मशीनला हार घातला. त्यानंतर काही वेळातच त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने या प्रकाराची गंभीर दखल घेत शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.





