माजी मंत्री गुलाबराव देवकर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात धरणगावात का नव्हते सक्रिय?
आगामी विधानसभा निवडणुकीत धरणगाव तालुक्यातील ठाकरे गट काय भूमिका घेणार?
धरणगाव (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लोकसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष आणि त्यांचे नेते झाडून प्रचाराला लागले होते. दुसरीकडे मात्र, जळगाव ग्रामीणचे माजी आमदार तथा मंत्री गुलाबराव देवकर हे मात्र, धरणगाव तालुक्यात प्रचारात फारसे सक्रीय दिसले नाहीत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटणार, असे बोलले जात आहे.
मतदारसंघात चर्चेला आला ऊत
नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचे अनपेक्षित असे एकत्रीकरण मतदारांना पाहायला मिळाले. कधी अपेक्षा केली नसेल अशा युती व आघाड्या लोकांना पाहायला मिळाल्या. जळगाव ग्रामीण लोकसभा मतदारसंघदेखील अपवाद ठरला नाही. या मतदारसंघाचे खासदार पक्ष सोडून दुसर्याच पक्षाला जाऊन मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. जळगाव ग्रामीण मतदार संघामध्ये नामदार गुलाबराव पाटील आणि माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्याकडेही सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र गुलाबराव देवकर हे त्यांच्या हक्काच्या मानल्या जाणार्या धरणगाव तालुक्यात लोकसभेसाठी मतदान मागताना दिसलेच नाही. यामुळे मतदार व नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

लढवले जाताय विविध तर्क-वितर्क
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होती मात्र या आघाडीसाठी प्रचार करताना धरणगाव तालुक्यात गुलाबराव देवकर लोकांना दिसले नाहीत. त्यांनी जळगाव तालुक्यात काही ठिकाणी प्रचारात भाग घेतला. परंतू धरणगाव तालुक्यात ते मात्र, पाहिजे तसे सक्रीय नव्हते. यामागे नेमकी कारणं काय?, राजकारणातील गोळाबेरीजात याचा त्यांना फायदा होईल की, नुकसान?, हे तर आगामी काळाच ठरवेल. दुसरीकडे सुरेशनाना चौधरी, गुलाबराव वाघ, निलेश चौधरी अगदी नव्याने पक्षात दाखल झालेले लक्ष्मण पाटील (लकी टेलर) यांनी देखील प्रचारात जोरदार सहभाग घेतला. परंतू देवकर यांचे लोकसभा निवडणूक प्रचारात धरणगाव तालुक्यात फारसे सक्रीय नव्हते? यामुळे तर्कवितर्कांना आतापासूनच ऊत आला आहे.
तर विधानसभा निवडणुकीत बसेल फटका ?
गुलाबराव देवकर प्रचारापासून दूर का राहिले?, हे कळायला मार्ग नाही. मात्र, याचा परिणाम येणार्या विधानसभेच्या निवडणुकांवर नक्की होणार आहे. आगामी विधानसभेसाठी गुलाबराव देवकर यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिल्यास त्यांच्या प्रचारासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे धरणगाव तालुक्यातील नेते सक्रिय होतील का? हा एक मोठा प्रश्न तेव्हा उपस्थित होणार आहे मात्र गुलाबराव देवकर प्रचारापासून दूर राहिल्याचा परिणाम येणार्या आगामी विधानसभा निवडणुकीत बसेल, अशी भीतीदेखील व्यक्त केली जात आहे.




