हज यात्रेला जाणार्या पाळधीतील भाविकांना गुलाबभाऊंनी दिल्या शुभेच्छा !
पाळधी, ता.धरणगाव (प्रतिनिधी) : हज यात्रेला जाणार्या पाळधीतील भाविकांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुभेच्छा दिल्यात. गुलाबभाऊंचे गावातील अनेक मुस्लीम बांधवांशी पारिवारिक ऋणानुबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
जिल्ह्यात 657 भाविक रवाना
मुस्लिम धर्मातील पाच स्तंभांपैकी एक असलेल्या हज यात्रेला यावर्षी महाराष्ट्र राज्य समितीतर्फे राज्यांतील 15 हजार भाविकांचा सोडतीद्वारे नंबर लागला आहे. यात जळगाव जिल्ह्यातून 657 भाविक हज यात्रेसाठी जात आहेत. त्यात पाळधी येथील हमीद मुल्लाजी शेख लतीफ, शेख युनूस शरीफ मणियार, आकलख शेख यांच्यासह काही महिलांचा समावेश आहे. या सर्व भाविकांना पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी हज यात्रेच्या माध्यमातून आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, अशा शब्दात सर्व भाविकांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी सुलतान पठाण, दानिश पठाण, अकिल खान, माजीद शेख, शोएब मणियार यांच्यासह अनेक ग्रामस्थ देखील उपस्थित होते.





