मुक्ताईनगरात आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध : भाजपाचा रास्ता रोको
Protest of MLA Jitendra Awad in Muktainagar : Block the path of BJP मुक्ताईनगर : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडल्याने आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करीत मुक्ताईनगरात भाजपा पदाधिकार्यांनी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन केले तर रावेरात आमदार आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
मुक्ताईनगरात रास्ता रोको
मुक्ताईनगरातील आंदोलनात विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक कांडेलकर, भाजपा तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, राजेंद्र सवळे तालुका उपाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष अतुल महाजन, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस मोहन महाजन, अनु.जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संतोष झनके, भाजयुमो तालुकाध्यक्ष विशाल झाल्टे, शहराध्यक्ष पंकज कोळी, कुर्हा शहराध्यक्ष प्रवीण शिंपी, भाजपा युमो जिल्हा उपाध्यक्ष सोपान झाल्टे, जिल्हा उपाध्यक्ष कामगार आघाडी ईश्वर मिस्तरी, पिंप्राळा सरपंच रामचंद्र कोळी, सोमनाथ पाटील, विकास कांडेलकर, दिलीप सोनवणे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रावेरात जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला मारले जोडे
रावेर : रावेर तालुका भाजपतर्फे गुरुवारी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात खासदार रक्षा खडसे, रावेर लोकसभा संपर्क प्रमुख नंदकिशोर महाजन, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रंजना पाटील, लोकसभा क्षेत्र प्रमुख नंदकिशोर महाजन, उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, पद्माकर महाजन, जिल्हा सरचिटणीस हरलाल कोळी, तालुकाध्यक्ष महेश चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, संदीप सावळे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष संजय पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती महेश पाटील, प्रा.सी.एस.पाटील, गोपाळ नेमाडे, दुर्गादास पाटील, माजी तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, शहराध्यक्ष दिलीप पाटील, दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष संजय बुवा, तालुका प्रसिद्धी प्रमुख नितीन पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष चेतन पाटील, माजी अध्यक्ष महेंद्र पाटील, अजनाडचे विजय महाजन, उमेश महाजन, मनोज श्रावक, रजनीकांत बारी, संजय महाजन, शुभम पाटील, दुर्गादास पाटील यांच्यासह भाजपाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




