यावल पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने केली सव्वा दोन लाखांची दारू नष्ट


Yaval police destroyed liquor worth two and a half lakhs on the orders of the court यावल : यावल पोलीस ठाण्यात स्थानिक पोलीस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत पकडलेली दारू (मद्य) हे न्यायालयाच्या आदेशाने नष्ट केले. यावल पोलीस आणि दारूबंदी विभागाकडून आजवर दोन लाख 25 हजार 154 रुपयांची दारू जप्त करण्यात आली. ती दारू न्यायालयाच्या आदेशाने बुधवारी पोलीस ठाण्याच्या मागे खड्डे खोदून नष्ट करण्यात आली.

न्यायालयाच्या आदेशाने दारू नष्ट
यावल शहर व तालुक्यात यावल पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करून अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने दारू जप्त केली होती. भुसावळ राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडून देखील कारवाया करण्यात आल्या होत्या. अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने पकडण्यात आलेली देशी-विदेशी दारूच्या गुन्ह्यांचा न्यायनिर्वाळा झाला असून न्यायालयाने ही दारू नष्ट करण्याचे आदेश यावल पोलिसांनी दिले. न्यायालयाच्या आदेशाने यावल पोलिसांच्या ताब्यात असलेली दारू नष्ट करण्यात आली.



यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर खान, पोलीस हवालदार सुशील घुगे यांच्या उपस्थितीत बाटल्या फोडून दोन लाख 25 हजार 154 रुपयाची देशी-विदेशी दारू नष्ट करण्यात आली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !