खचू नका, शासन आपल्या सोबत : अमोल जावळे यांचा शेतकर्‍यांना धीर


रावेर : वादळामुळे रावेर तालुक्यात शेकडो हेक्टरवरील केळी भुईसपाट झाली आहे. शेतकरी चिंताग्रस्त असतांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या भेटी घेत नुकसानीमुळे खचून जाऊ नका, शासना आपल्यासोबत असल्याचे सांगत नुकसानीचे शासनाकडून पंचनामे करण्यासंदर्भात आपण शासन स्तरावर बोललो असल्याचे केळी उत्पादकांना सांगितले.

रावेर तालुक्यात सर्वाधिक फटका
रावेर तालुक्यातील नेहते, दोधे, अटवाडे, खिरवड, अहिरवाडी गाव परिसरात अवकाळी पाऊस व वादळामुळे शेतकर्‍यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भागात भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. केळी या भागातील प्रमुख पीक असून केळी बागांचे तसेच खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त नागरिक व शेतकर्‍यांची भेट घेत संवाद साधण्यात आला. शेती पिकांचे झालेल्या नुकसानीचे निराकरण करण्यासाठी व नुकसान भरपाई मिळण्यासाठी नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्यात यावेत व यात एकही बाधीत सुटता कामा नये यासंबंधी संबंधित अधिकार्‍यांशी यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांच्या सोबत भाजपा तालुकाध्यक्ष महेश चौधरी, युवा नेते संदीप सावळे व शेतकरी यावेळी उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !